
बेकायदेशीर बांधकामांवर कायदेशीर कारवाई व्हावी,- किरीट सोमय्या
भाजपचे माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी दि. १७ रोजी दापोली मुरुड येथे पुन्हा भेट दिली. मुरुड समुद्रकिनारी बांधलेले बेकायदेशीर बंगलो तसेच रिसॉर्ट तोडण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले.
दापोली तालक्यातील मुरुड हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटनस्थळी बेकायदेशीर बंगलो, रिसॉर्ट अशी बांधकामे झाली असून या बेकायदेशीर बांधकामांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या बाबत किरीट सोमय्या यांनी आवाज उठविला आहे. ही बेकायदेशीर बांधकामे पालकमंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
www.konkantoday.com