उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची व नारायण राणे यांची रत्नागिरी येथे भेट?आणि मुख्यमंत्र्यांना ही फोन
शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. दोघांमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पण निधीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे भेट घेतली, असे जर तुम्हाला कोणी सांगितले, तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही.त्याचबरोबर तुम्ही मला कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती देखील नारायण राणे यांनी दिली.
मुख्य गोष्ट म्हणजे हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण तुम्हाला अभिप्रेत असलेले अर्थात केंद्रीय मंत्री नारायण राणे नाहीत. तर हे नारायण राणे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे नागरिक आणि माजी पंचायत समिती सदस्य. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उदय सामंत पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे विकास कामाचा निधी मिळावा, यासाठी सावंतवाडीचे नारायण राणे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली.
उदय सामंत यांनी याच वेळी बोलताना नारायण राणे भेटीला आल्याची माहिती दिली आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पण, लगेचच त्यांनी हे नारायण राणे शिवसेनेचे सावंतवाडीतील माजी पंचायत समिती असून आपल्या भेटीसाठी आल्याचा म्हटले. पण हे जरी काही असले तरी क्षणभर का असेना सर्वजण विचारतच पडले होते.
नारायण राणे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी त्या वेळी बोलताना आपला राष्ट्रवादीतून शिवसेनेने झालेला राजकीय प्रवास सांगितला. मुख्य गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन देखील त्यांनी अभिमानाने दाखवले. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मला कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. जेव्हा आमची भेट झाली, तेव्हा तुम्ही मला कधीही फोन करा. मी तुमचा फोन घेणार. फक्त सावंतवाडीहून नारायण राणे बोलतो आहे, असं सांगा. कारण त्या नारायण राणे यांचा फोन मी घेत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी सांगितले.
www.konkantoday.com