
रत्नागिरी विमानतळासाठी संपादित करण्यात येणार्या जागेसाठी एकही हरकत नाही, भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागणार
रत्नागिरी विमानतळासाठी संपादित करण्यात येणार्या जागेसाठी गेल्या दोन महिन्यांमध्ये एकही हरकत आलेली नाही. २८ एकर जागेसाठीच्या हरकतीचा कालावधी आता संपुष्टात आल्याने लवकरच अंतिम १९ क्रमांकाची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या विमानतळासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याने विमानतळाचे उर्वरित काम लवकरच होण्याची शक्यता आहे.
मिरजोळे, तिवंडेवाडीतील विमानतळासाठी आवश्यक २८ एकर जागेची संयुक्त मोजणी ७ ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये पूर्ण झाली. ३० डिसेंबरला भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यावर ६० दिवसांमध्ये हरकती मागवल्या होत्या. हा कालावधी आता संपुष्टात आला आहे. २३ ऑगस्ट २०१६ ला या विमानतळाचा उड्डान योजनेमध्ये समावेश झाल्यामुळे पुन्हा नागरी वाहतूक सेवेसाठी ३३ हेक्टर क्षेत्राची आवश्यकता आहे. धावपट्टी तयार असली तरी या परिसरामध्ये विमाने थांबविण्यासाठी जादा जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे. त्यासाठीची ही २८ एकर जागेचे भूसंपादन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com