केंद्र सरकारची कोकण रेल्वेला 380 कोटी रुपयांची मदत जाहीर
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं राज्यातील कोकण रेल्वेला 380 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचं आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लोकसभेत सांगितले.यामुळे कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळणार आहे. मागील काही वर्षात आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वेने प्रवास करण्याचा कल वाढलाय. त्या दृष्टीकोनातून हा निधी महत्वाचा ठरणार आहे. या निधीतून कोकण रेल्वेचा विकास तर होणारच पण सोबत प्रवाशांना सोयी सुविधा मिळणार आहे. कोकणात अनेक पर्यटन स्थळ प्रसिध्द आहे . या निधीने पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार, असे म्हणता येईल.
www.konkantoday.com