
रत्नागिरी चे ग्रामदैवत भैरी देवाला पोलिसांकडून मानवंदना
आज रंगपंचमी…कोकणातील शिमगोत्सवात रंगपंचमी, हा महत्वाचा दिवस. रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला चक्क पोलिस मानवंदना देतात.रत्नागिरीच्या शिमगोत्सवात आजही अशा परंपरा कायम असलेल्या पहायला मिळतात. त्यातील एक म्हणजे सशस्त्र सलामीची… बंदूकधारी पोलिस पालखीला मानवंदना देतात. ब्रिटिश काळापासून चालत आलेली हि परंपरा रंगपंचमीला रत्नागिरीत अनुभवायला मिळतेय. पालखीला मानवंदना देण्याची परंपरा आज हि अंगावर रोमांच उभे करते. त्याचप्रमाणे रंगपंचमी खेळत – खेळत श्री.जोगेश्वरी देवी,श्री.नवलाई देवी व सिटी पोलीस स्टेशन आवारातील महापुरुष मंदिराला भेट देवून भैरी देवाची पालखी ही आज सहाणे वरून मंदिराकडे रवाना होणार.