मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी- मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. विविध प्रकारच्या पाककृतींचे प्रदर्शन उप परिसरात मांडले होते.
या स्पर्धेसाठी फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.कौशल प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच डॉ.प्रसाद यांच्या पत्नी सौ. मनीषा प्रसाद स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेल्या.
स्पर्धेच्या निकालांती पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेच्या औचित्याने कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे विविध चविष्ट पाककृतींचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात संचालक डॉ. किशोर सुखटणकर आणि सहाय्यक कुलसचिव बोरगावे यांचे मार्गदर्शन मिळाले.कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाबाबत WDC , NSS कार्यक्रमाधिकारी तसेच NSS स्वयंसेवकांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button