
बदललेल्या वातावरणाने ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम लांबला
गावखडी येथे समुद्रात झेपावली कासवाची 80 पिल्ले
रत्नागिरी : बदललेल्या वातावरणामुळे समुद्रातील ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा विणीचा हंगाम लांबला आहे. गावखडी येथे संरक्षित घरट्यांमधून 20 मार्च रोजी 82 पिल्ले समुद्रात दाखल झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, त्यांची पत्नी स्मिता पाटील, राजापूरच्या तहसीलदार श्रीमती जाधव, वनक्षेत्रपाल प्रियंका लगड, गावखडी सरपंच श्री. तोडणकर, कांदवळवन कक्ष गावखडीच्या अध्यक्ष श्रीमती आंब्रे यांच्यासह कांदळवन प्रतिष्ठान मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रदीप डिंगणकर यांच्यासह कांदळवन सहव्यवस्थापन समिती व वन विभागाच्या कर्मचार्यांनी येथे कासवांची घरटी संरक्षित केली होती. सह्याद्री निसर्ग मित्रचे नीलेश बापट यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. गावखडी समुद्र किनार्यावर लावलेल्या माहिती फलकांचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.