पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता इंधन दराचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचा खिसा आजपासून कापला जाणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button