स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाचा आज प्रारंभ झाला. दिनांक २० जून ते २० जुलै हा कालावधी प्रतिवर्षी स्वरूपानंद पतसंस्था 'ठेववृद्धी मास' म्हणून घोषित करते. आज या ठेव महोत्सवाचा दणक्यात प्रारंभ गुंतवणूकदारांनी केला. संस्थेच्या १७ ही शाखांमध्ये ठेवीदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ९५ ठेवीदारांनी मिळून रुपये १ कोटी ४८ लाखाच्या नवीन ठेवी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांमध्ये गुंतवल्या.
८.२५% ते ९% व्याजदराच्या विविध ठेव योजना ठेवीदारांच्या पसंतीस उतरलेल्या दिसत असून या ठेव योजनांमध्ये मोठी ठेव गुंतवणूक होताना दिसत आहे.
स्वरूपानंद ठेववृद्धी मास हा 'ठेव महोत्सव' म्हणून साजरा करते. आज प्रत्येक शाखेत ठेवीदारांची लगबग सुरू होती. त्यांच्या स्वागतासाठी स्वरुपानंदचे कर्मचारी, अधिकारी सज्ज होते. ठेवीदारांच्या मनात स्वरूपानंद पतसंस्थेबद्दल असलेला स्नेह, विश्वास याचे प्रत्यंतर ठेवीदारांजवळ बोलताना जाणवत होते. हा उत्साह पुढील संपूर्ण महिना अशाच पद्धतीने खळाळत राहील असा विश्वास ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.