
फोटो काढताना पाय घसरल्याने चिपळूण तालुक्यातील वीर देवपाट येथे धबधब्यात पडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू
मुंबईहून मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील तरुणाचा फोटो काढत असल्यानं पाय घसरल्याने चिपळूण तालुक्यातील वीर देवपाट येथील धबधब्याच्या पाण्यात पडून मृत्यूहोण्याची घटना शनिवारी घडली
सुरेंद्र भैरव श्रीवास्तव (२५)राहणार धारावी असे या तरूणाचे नाव आहे
वीरेंद्र श्रीवास्तव हा त्याच्या मित्रांसोबत शनिवारी वीर देवपाट येथील धबधब्याच्या ठिकाणी फिरण्यासाठी आला होता त्यानंतर तो त्यांच्या अन्य सहकाऱ्यांसोबत धबदब्याच्या किनाऱ्यावरील दगडावर राहून फोटो काढत होता अचानक त्याचा पाय घसरून तो धबधब्याच्या सुमारे चाळीस फूट खोल पाण्यात पडला त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला
www.konkantoday.com