उन्हाळी सुट्यांनिमित्त प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे विशेष एक्स्प्रेस चालवणार
उन्हाळी सुट्यांनिमित्त प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे विशेष एक्स्प्रेस चालवणार आहे.पुणे-जयपूर, पुणे-करमळी, मुंबई-शालिमार, नागपूर-मडगाव, पनवेल-करमळी विशेष एक्स्प्रेसच्य एकूण ९६ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.पनवेल ते करमळी (१८ फेऱ्या)
- गाडी क्रमांक ०१४०५ पनवेल येथून ९ एप्रिल ते ४ जूनपर्यंत दर शनिवारी रात्री ११ वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचेल.
- परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४०६ विशेष गाडी ९ एप्रिल ते ४ जूनपर्यंत दर शनिवारी सकाळी ९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८ वाजता पोहोचेल.
- थांबे ः रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
३. पुणे ते करमळी (१८ फेऱ्या)
- गाडी क्रमांक ०१४०३ विशेष गाडी ८ एप्रिल ते ३ जूनपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचेल.
- परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४०४ विशेष गाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर रविवारी करमळी येथून सकाळी ९.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३५ वाजता पोहोचेल.
थांबे ः लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
नागपूर ते मडगाव (२० फेऱ्या) - गाडी क्रमांक ०१२०१ विशेष गाडी ९ एप्रिल ते ११ जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१२०२ विशेष गाडी १० एप्रिल ते १२ जूनपर्यंत पर्यंत दर रविवारी रात्री ८.१५ वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
- थांबे ः वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
www.konkantoday.com