रत्नागिरीत गावच्या वेशीबाहेर जाऊन होळी तोडण्याची प्रथा आजही कायम.
कोकणातील महत्त्वाचा आणि पारंपारिक सण म्हणजे शिमगा या शिमग्याचे आकर्षण देव देवतांच्या पालख्या नाचवणे, तसेच होळी उभी करणे हया अनोख्या परंपरा आहे कोकणातील.होलिका उत्सव म्हणजेच शिमगोत्सवाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. आणि कोकणात होळी उभी करणे हि प्रथा आहे.आज काजरघाटी गावाची महालक्ष्मी देवतेची पालखी होळी तोडण्यासाठी रत्नागिरी शहरातील खडपेवठार मध्ये दाखल झाली मोठ्या भक्तिभावाने काजरघाटी येथून आलेल्या महालक्ष्मी पालखीचे जंगी स्वागत झाले त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पालखीला गाराणे घालून खडपेवाटार मधील पोफळी झाडाच्या होळीचे तोड करण्यात आले व ती ढोल – तास्यांच्या गजारात वाजत गाजत काजरघटी गावाकडे नेण्यात आली.