नारायण राणे , नितेश राणे आणि निलेश राणे यांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय तो त्यांनी सांभाळावा -खासदार विनायक राऊत

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे पितापुत्रांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे , नितेश राणे आणि निलेश राणे यांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय तो त्यांनी सांभाळावा, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी केली आहे
.नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो. पण मोदी कृपेने मिळालेलं मंत्रीपद हे जनतेसाठी वापरावं. त्यांनी जनतेला योग्य प्रकारे मदत करावी. नाहीतर हे मंत्रीपद स्वाहा करतील, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवरही टीका केली. फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब फुसका बार आहे, असं ते म्हणाले. मी पुन्हा येईन… पुन्हा येईन… असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतील. माझ्या त्यांना होळीच्या शुभेच्छा आहेत. तसेच बुरा न मानो होली है, पण एक दिवस तरी चांगलं बोला, असा सल्ला मी भाजपवाल्यांना देईन, असा चिमटाही राऊत यांनी काढला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

विनायक राऊत यांनी यावेळी आघाडी सरकार भक्कम असल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कायम राहणार आहे. तसेच यापुढील काळातही राज्यात ठाकरे सरकारचा येणार आहे, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button