
कशेडी घाटात कारने घेतला पेट
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात मंगळवारी दि १५ रोजी बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी डस्टर मोटारीने (जीजे०५-जेएफ-०२२२) अचानक पेट घेतला. मोटारीतून धूर येताना पाहून चालकाने मोटार रस्त्याच्या बाजूला उभी करून दूर अंतरावर जाणे पसंत केले. मोटारीने पेट घेतल्या नंतर काही क्षणातच ती पूर्ण जळून खाक झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी कशेडी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी श्री. बोडकर, समिल सुर्वे यासह काही सामाजिक कार्यकर्ते पोहोचले.