देवेंद्र फडणवीस याचे समर्थन आणि महाआघाडी राज्य शासनाच्या आकस ठेऊन चाललेल्या कामकाजाचा रत्नागिरी भाजपा तर्फे निषेध


विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस निर्भीड पणे लोकहिताचे मुद्दे मांडत आहेत. महाआघाडी शासनाच्या कारभाराचे विधिमंडळातील आयुध वापरात वाभाडे काढत आहेत. त्यांच्या पाठीशी हजारो कार्यकर्ते व राज्यातील जनता उभी आहे.
आज मुंबई पोलीस अधिकारी देवेंद्रजी फडणवीस यांनी विसल ब्लॉवर म्हणून केलेल्या आक्रमक कामामुळे गोंधळून जाऊन फडणवीस यांना सी आर पी सि कलम 160 प्रमाणे नोटीस बजावली विरोधी पक्ष नेते या दायित्वाला जागत देवेंद्रजिनी पेन ड्राईव्ह , ऑडिओ रेकॉर्डिंग विधानसभा अध्यक्ष याना सुपूर्त केलं त्या माध्यमातून राज्यशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले . त्यांचं हे काम विरोधीपक्ष नेते म्हणूच्या कामाचा भाग आहे. प्राप्त अहवाल प्राप्त पुरावे यावर आधारून शासनाने कडक कारर्वाई करणे अपेक्षित असताना देवेंद्रजी यांना नोटीस पाठवून राज्यशासनाने खुनशी वृतीच दर्दन घडवलं आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी भाजपा कार्यकर्ते ठाम पणे उभे अहेत असे प्रतिपादन अँड. दीपक पटवर्धन यांनी केले. आघाडीशासनाच्या देवेंद्रजी ना नोटीस पाठवण्याच्या कारवाईचा निषेध करावा म्हणून रत्नागिरी बाजारपेठेत तसेच राजापूर बाजारपेठ येथे कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध केला. व देवेंद्रजींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
अँड बाबा साहेब परुळेकर सचिन करमरकर बाबू सुर्वे नगरसेवक राजू तोडणकर समीर तीवरेकर सुप्रिया रसाळ मानसी करमरकर सौ रायकर यांचे सह अनिकेत पटवर्धन सचीन वहालकर नितीन जाधव प्रमोद खेडेकर योगेश हळदवणेकर उमेश खंडकर मनोज पाटणकर विक्रांत जैन प्रवीण देसाई पल्लवी संपदा तळेकर मंदार खंडकर पाटील निलेश आखाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button