जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदी किरण सामंत


रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण उर्फ भय्या सामंत यांच्यासह अन्य सर्व पदांची बिनविरोध निवड झाली.
असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व्यंकटेश हॉटेल मारूती मंदिर रत्नागिरी येथे झाली. या सभेमध्ये नवीन कार्यकारिणी करण्यात आली. अध्यक्ष पदावर किरण उर्फ भैया सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदावर मंत्री उदय सामंत कार्यरत होते. संघटनेच्या सचिवपदी बिपीन बंदरकर व खजिनदारपदी प्रदीप साळवी यांची तर कार्याध्यक्ष दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, उपाध्यक्षपदी दीपक मोरे, दीपक देसाई, तांत्रिक सल्लागार सईद मुकादम, सुरेश जैन, सहसचिव किशोर भुते, रमेश कसबेकर, हेमंत साळवी, निलेश भोसले, दीपक पवार, लाल्या खातू, अमित लांजेकर, सुनिल घोसाळकर, बलराम कोतवडेकर, श्रद्धानंद सावंत, दिनेश माईन, सचिन कुलकर्णी, निखिल देसाई, मनोहर गुरव यांची निवड करण्यात आली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button