सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार उत्तम रिझल्ट प्रदर्शित करणारे असतील – ॲड. दीपक पटवर्धन


२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंतिम महिन्यात अंतिम पंधरवड्यात असताना या आव्हानात्मक वर्षातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार सातत्यपूर्ण वाढलेले दिसत आहेत. वसुली हा विषय खूप जिकिरीचा आहे. मात्र सातत्याने पाठपुरावा करत कर्जदारांचे सहकार्य प्राप्त करत स्वरूपानंद पतसंस्था आपले विक्रमी वसुलीचे प्रमाण राखेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष ॲड.पटवर्धन यांनी व्यक्त केला.
हाताच्या बोटावर मोजावे एवढे नाठाळ कर्ज व्यवहारांसंदर्भाने संस्थेने कायदेशीर कारवाई सुरू केली असून अन्य सर्व कर्ज परतफेड नियमित वसूल होत आहे. संस्थेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी योग्य पाठपुरावा करत वसुली केली आहे.
३१ मार्चपर्यंत संस्था २५० कोटींचा टप्पा गाठेल. तर येणे कर्ज १७१ कोटींच्या पल्याड जाईल. संस्थेची गुंतवणूक ११६ कोटींची असेल. ठेव कर्ज प्रमाण ६० टक्के राखण्यात संस्था यशस्वी ठरेल. तसेच एस.एल.आर आणि सी.आर.आर गुंतवणुकीचे पर्याप्त प्रमाण राखण्यात संस्था पूर्ण वर्षभर यशस्वी झाली आहे.
संस्थेकडे चालू आर्थिक वर्ष अखेरीस १० कोटींची गंगाजळी १७ कोटींची मालमत्ता निर्मिती निधी असून नवीन तंत्रज्ञान, व्याज चढउतार, कोव्हीड सभासद सहायता तरतूद, प्रशिक्षण तरतूद, सोने तारण दर चढउतार तरतूद अशा विविध प्रकारच्या ५ कोटींपेक्षा जास्त तरतुदी संस्थेने केलेल्या आहेत. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे गुंतवणूकदार, ठेवीदार यांना अत्यंत सुरक्षित गुंतवणूक संधी दिल्या आहेत आणि ही सुरक्षितता संस्थेच्या आर्थिक पत्रकाद्वारे अधिक स्पष्ट होते. चालू आर्थिक वर्ष अखेरीस संस्था अधिक सशक्त आर्थिक ताकद बनून नव्या आर्थिक वर्षाला सामोरे जाईल असे प्रतिपादन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.
सध्या संस्थेच्या १७ शाखा कार्यरत असून सर्व शाखा उत्तम आर्थिक उलाढाली करत आहेत. १७ शाखांपैकी ६ शाखा स्वमालकीच्या कार्यालयामार्फत व्यवहार करीत आहेत. अधिक काही शाखा नव्या आर्थिक वर्षात स्वमालकीच्या जागेत स्थानापन्न होतील असे ॲड.पटवर्धन म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button