रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटी
अनेक वर्षे रखडलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये १०० कोटींची तरतूद केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक रत्नागिरी उपकेंद्रासाठी दोन कोटी, राज्यातील महापुरूषांशी संबंधित शाळांमध्ये जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश असून त्यांना प्रत्येकी एक कोटीचा निधी मिळणार आहे. रेवस रेड्डी या सागरी महामार्गासाठीही भरीव तरतूद करण्यात आली.
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकासाला बुस्टर मिळाला. रत्नागिरी विमानतळावरून खाजगी प्रवासी वाहतुकीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी विमान पार्किंग आणि काही यंत्रणा उभारण्यासाठी भूसंपादन आणि नवीन बांधकामासाठी निधीची गरज होती. या अर्थसंकल्पात विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कोकण कृषि विद्यापीठासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक रत्नागिरी उपकेंद्राच्या विकासासाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
www.konkantoday.com