
विजयोत्सव साजरा केला त्यामध्ये टीका करण्यासारखे काय ?रत्नागिरीतील सत्ताधुंद प्रवृत्तींना सत्ताभ्रष्ट करण्याची संधी नक्की साधू- भा.ज.पा रत्नागिरी
४ राज्यांच्या विधानसभेमध्ये भा.ज.पा चा दणदणीत विजय झाला. याचा आनंद भा.ज.पा रत्नागिरीने साजरा केला. भा.ज.पा हा एकसंघ पक्ष आहे. त्यामुळे झालेल्या विजयाचा आनंद व्यक्त करणे यात टीका करण्यासारखे काय?
आनंदोत्सव साजरा करणे ही हिंदुधर्मातील परंपरा संस्काराचा भाग
आनंद व्यक्त करणे, विजयोत्सव साजरा करणे, हि हिंदू परंपरा, संस्कृती आहे. टीका करणाऱ्यांना संस्कार, संस्कृती, अभिव्यक्ती एकसंघता याबाबत काही माहिती असण्याची अपेक्षा करणे चुकीचं आहे.
“भारतमाता की जय” ,”जय भवानी……” या घोषणा दिल्या याचा राग येऊन टीका
भा.ज.पा रत्नागिरी यांनी “भारत माता की जय” , “जय शिवाजी जय भवानी” या घोषणा अन्य घोषणा बरोबर दिल्या. कदाचित आचार, विचार, संस्कार संदर्भ बदलल्याने या घोषणांवर आक्षेप घेण्यासाठी टीका केली असावी.
कार्यकाळ अपूर्ण कामांची मांदियाळी
सत्तेत प्रदीर्घकाळ असून पाणीयोजना पूर्ण करू न शकलेल्या, तारांगणाचे काम अपूर्ण ठेवून अधिकारावरून पाय उतार झालेल्या ,रत्नागिरी शहराचे विद्रुपीकरण हयासाठी कार्यकाळ व्यतीत करणाऱ्या उद्दाम प्रवृत्तीनी सत्तेत असल्याचा दर्प दाखवणारी टीका केली आहे. सत्ता सदा सर्वकाळ नसते याची जाणीव ठेवावी.येत्या निवडणुका मध्ये भा.ज.पा कार्यकर्ते रत्नागिरीकरांच्या साथीने सत्तेचा दर्प नक्की उतरवतील. गोव्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भा.ज.पा विजयी होत असतांना महाराष्ट्रात सत्तेतील प्रमुख घटक असणार्या पक्षाला डिपॉझिट वाचवता आल नाही. किंबहुना नोटा ऑप्शनला पडलेल्या मतांपेक्षा कमी मतं पडली. याची जाणीव ठेवावी. अशी खरमरीत प्रतिक्रिया भा.ज.पा.रत्नागिरीने दिली.
निष्ठावान राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांची फळी शाबूत आहे
रत्नागिरी भा.ज.पा.ला यश मिळाले नाही. याचा अर्थ भा.ज.पा.चा जनाधार नाही असं समजण्याचं कारण नाही. २० वर्ष लोकप्रतिनिधी नसतांना निष्ठावान कार्यकर्ते पक्षाच्या ध्येयधोरणांशी बांधिल मतदार याचे प्रत्यंतर सातत्याने येत. विविध आमिष, धाक, दबाव सत्ता याची विलोभन दाखवूनही भा.ज.पा.चा निष्ठावान कार्यकर्ता भा.ज.पा प्रेमी राष्ट्रभिमानी मतदार भा.ज.पा बरोबर जोडलेला राहतो. म्हणून ४ राज्यातल्या विजयाचा विजयोत्सव येथे साजरा होतो. हे टीकाकारांनी जाणून असावे. भा.ज.पा.ला राष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळतंय.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली हिंदुस्थान जगासमोर येतोय. राम मंदिराची उभारणी, काशीविश्वेश्वर जीर्णोद्धार, ३७० कलम नष्ट करून काश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य घटक असल्याचे अधोरेखित करत आत्मनिर्भर भारताची संकल्पना दृष्टीपथात आणतानाच गरीब कल्याणाच्या अनेकविध योजनांचा लाभ थेट लाभार्थीपर्यंत पोहोवचण्यात यशस्वी झालेला पक्ष म्हणजे भा.ज.पा आणि अशा पक्षाला मिळालेला विजय साजरा करणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मात्र सत्तेच्या दर्पामध्ये औद्योगीकरण, विकास, युवकांचे भवितव्य या सर्वांला नजरअंदाज करणाऱ्या प्रवृत्ती यांना सत्तेच्या दर्पात सर्वाचा विसर पडतो त्याला काय करणार ?अशी प्रतिक्रिया भाजपा कार्यालयाने दिली.