शिरगाव येथे 15 जुलै रोजी रोजगार मेळावा

रत्नागिरी : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन 15 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था बाया कर्वे कौशल्य विकास केंद्र, शिरगाव, रत्नागिरी येथे याचे आयोजन करण्यात आले आहे.  जागतिक युवा कौशल्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वे कौशल्य विकास केंद्र, शिरगाव आणि जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा होणार आहे. www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आस्थापनांनी आपणाकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे अधिसूचित करावीत. युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन रिक्त पदे ऑनलाईन अधिसूचित करावीत आणि प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याचे माध्यमातून उमेदवारांची निवड करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी या कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन इनुजा शेख, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरिता मो.क्र. 9422191517, दूरध्वनी क्रमांक- 02352-221478/299385 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button