चार राज्यातील दणदणीत विजय रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात केला साजरा


उत्तरप्रदेश उत्तराखंड गोवा मणिपूर या राज्यात प्रचंड बहुमताने भाजपाचा विजय झाला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच लोकाभिमुख कार्य अंत्योदयाच्या राबवलेल्या उपयुक्त योजना , याला राज्यातील सरकारांनी दिलेली सकारात्मक साथ योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात केलेली विकास काम या सर्वाला संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली साथ. यामुळे एक मोठा विजय जनतेने भाजपा ला दिला. नरेंद्र मोदी जी चे नेतृत्व आणि भाजपा संघटना याला देशव्यापी संमती आहे हे अधोरेखीत झाले. अशी उत्सपुरत प्रतिक्रिया जिल्हा अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.
गोवा राज्यातील विजय फार मोठा आहे. ह्या विजयाचे शिल्पकार देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व अधिक प्रकाशमान झाले. सर्वांचे अभिनंदन आणि विजयाचा आनंद रत्नागिरी भाजपा अध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या सह जेष्ठ नेते बाबा परुळेकर सचिन करमरकर अनिकेत पटवर्धन संदीप सुर्वे मनोज पाटणकर मुन्ना चवंडे दादा ढेकणे मानसी करमरकर शिल्पा मराठे विक्रम जैन योगेश हळदवणेकर प्रमोद खेडेकर पमु पाटील निशांत राजपाल प्रशांत डिंगणकार ओंकार फडके विजय सालीम सौ रसाळ सौ मोरे सौ रुमडे राजू पटवर्धन मंदार भोळे आदी अनेक कार्यकर्त्यांनी शहरात फटाके घोषणा देत नागरिकांना पेढे वाटत विजयाचा जल्लोष केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button