मजगाव रोडवर किस्मत बेकरीसमोर, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तिहेरी अपघात दुचाकीस्वार बचावला
रत्नागिरीः-किस्मत बेकरीसमोर गुरुवारी दुपारी बारावाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. ब्रेकफेल झाल्याने ट्रक उतारातून खाली आला. या ट्रकखालीसापडलेल्या दुचाकीचा अक्षरशःचेंदामेंदा झाला दुचाकी चालकाने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला तर ट्रक नेआणखी एका टेम्पोला धडक दिली.
याअचानक झालेल्या या दुर्घटनेने एकच गोंधळ उडाला. टेम्पोला
धडक दिल्यानंतर ट्रक थांबल्याने पुढील अनर्थ टळला.अपघातात दुचाकींचे पूर्णतः नुकसान झाले आहे. सुदैवाने यातकोणतीही जीवितहानी झाली नाही.
www.konkantoday.com