
ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे- उद्धव ठाकरे.
भाजपने सौगात ए मोदी ही योजना सुरू केली आहे. पण ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देणारे आता सौगात ए मोदी म्हणत आहेत.मोदी सुरुवातीला मंगळसूत्र धोक्यात आहे?, आता हिंदूंचे संरक्षण कोण करणार?, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर भाजपाला देखील जोरदार टोला लगावला.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.ठाकरे म्हणाले की, जे लोक आमच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत ते आता काय म्हणतील. भाजपने आता आपण हिंदुत्व सोडल्याची घोषणा करावी. भाजपने प्रथम विष वाटले, आता धान्य वाटत आहेत?, पण त्यांनी आपले हिंदुत्व सोडले का किंवा त्यांची ही योजना केवळ बिहार निवडणुकीपर्यंतच राहणार का? हे भाजपने स्पष्ट करावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.