महिला दिनानिमित्त दुर्लक्षित महिलांचा झाला सन्मान
रत्नागिरी… महिला दिनानिमित्त दुर्लक्षित महिलांचा सन्मान करण्याचा अनोखा कार्यक्रम आज रत्नागिरी येथे करण्यात आला.
रत्नागिरी तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने रत्नागिरी बसस्थानक नजीक भाजी विकून आपला चरितार्थ चालवित असणा-या महिलांचा त्यांच्या दैनंदिन व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी सकाळी साडी आणि गुलाब पुष्प देवून त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात आले.
सकाळ पासून रात्रौ 8 वाजेपर्यंत दररोज उन,वारा,पाउस यांची त्या व बाळगता अपाडकष्ट करणा-या शहरात भाजी विकून आपले कुटुंबांचे चरितार्थ चालवित असणा-या या महिलांकडे कोणाचे लक्ष जात नाही, त्यांच्या या मेहनतीचा यथोचित सन्मान महिला दिनानिमित्त करण्याचा मानस रत्नागिरी तालुका फोटोग्राफर असोसिएशन ने घेतला.आणि महिला दिनाच्या प्रारंभीच आपला असा आकस्मिक झालेला सन्मान पाहून या महिला अचंबित झाल्या आणि त्यांच्या चेह-यावर स्मीत हास्य उमटले, आनंदाश्रु वाहू लागले,या अनोख्या पद्धतीने केलेल्या सन्मानाची चर्चा शहरभर पसरली आणि या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.त्याचबरोबर संस्थेच्या एकमेव महिला फोटोग्राफर श्वेता बेंद्रे यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन चे कांचन मालगुंडकर,गुरु चौगुले, रत्नागिरी तालुका असोसिएशनचे अध्यक्ष सचीन सावंत, उपाध्यक्ष किरण खेडेकर, सचिव श्वेता बेंद्रे, सहसचिव ज्ञानेश कांबळे, खजिनदार दिनेश भातडे,उदयन्मोख फोटोग्राफर व सिनेमाटोग्राफर मंथन मालगुंडकर, फोटोग्राफर अजिंक्य सनगरे तसेच या कार्यक्रमाला संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफेउपस्थित होते.
www.konkantoday.com