महाराष्ट्रातील वनिता बोराडे देशातील पहिल्या महिला सर्पमित्र म्हणून सन्मानित
सापाला पाहताच अनेकांना भीती वाटते.पण बुलढाण्यातील एक महिला अशा सापांना सहज पकडते. तिने आतापर्यंत ५१ हजार साप पकडून जंगलात सोडले आहेत, हा विक्रमच आहे. विशेष म्हणजे तिने या सापांचे दात कधीच तोडले नाहीत. देशातील पहिली महिला सर्पमित्र जी वयाच्या १२ व्या वर्षापासून साप पकडतेय.
आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद 2020 आणि 2021 या वर्षासाठीच्या प्रतिष्ठेच्या नारी शक्ती पुरस्कारांनी 29 व्यक्तींना सन्मानित करणार आहेत. ८ मार्च रोजी राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम होणार आहे. वर्ष 2020 साठी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील वनिता बोराडे यांनाही देशातील पहिल्या महिला सर्पमित्र म्हणून सन्मानित करण्यात आलंय.
बुलढाणा शहरातील मेहकर येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय वनिता बोराडे यांना अनेकजण ‘सर्पमित्र’ म्हणतात. सापांच्या प्रजाती वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्या काम करताहेत. वनिता या महाराष्ट्रातील पहिल्या महिला सर्पमित्र आहेत. परिसरातील रहिवासी भागात विशेषतः पावसाळ्यात लोक बाहेर पडणाऱ्या सापांना पकडण्यासाठी वनिता यांना फोन करतात. आतापर्यंत त्यांनी मानवी वस्तीतून मोठमोठे साप तसेच विषारी सापांच्या अनेक प्रजाती पकडून त्यांना जंगलात सोडून दिले आहे,
www.konkantoday.com