प्रत्येकीचा संघर्ष वेगळा, प्रॉब्लेम वेगळ,गरज ही वेगळी आहे. त्यातून मार्ग काढून प्रत्त्येक जण अशी उभी राहिली तर मला ते फार आवडत -सिने नाट्य कलाकार निर्मिती सावंत
रत्नागिरी, दि.8: बायका काहीतरी करत आहेत याचा मला नेहमीच आनंद होत आला आहे. प्रत्येकीचा संघर्ष वेगळा, प्रॉब्लेम वेगळ,गरज ही वेगळी आहे. त्यातून मार्ग काढून प्रत्त्येक जण अशी उभी राहिली तर मला ते फार आवडत. असे प्रतिपादन सिने नाट्य कलाकार गंगुबाई फेम निर्मिती सावंत यांनी आज येथे केले.
रत्नागिरी ग्राहक पेठ च्या निमित्ताने आणि महिला दिनाचे ओचित्त्या साधून प्रदर्शन च्या शेवटचा दिवशी निर्मिती सावंत यांनी महिलांच्या प्रदर्शनला भेट दिली.
आपल्या संभाषणात त्या पुढे म्हणाल्या की, मला अश्या प्रदर्शनात जायला फार आवडते, वस्तू घ्यायला ही आवडत कारण त्या दर्जेदार असतात त्यामुळे कुठेही प्रदर्शन लागले की मी भेट देत असते.
वेळ कमी असूनही निर्मिती सावंत यांनी महिलांच्या प्रत्येक स्टॉल ला भेट दिली,आपुलकी ने संवाद साधला. महिलांनी त्यांना भेट वस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. त्या मुळे निर्मिती ताई भावनिक झाल्या.
प्रदर्शन दरम्यान महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचा निकाल आज जाहीर करून बक्षीस समारंभ निर्मिती सावंत यांच्या हसते करण्यात आला.
यावेळी नाचणे गावचे आणि जीवनदाई संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत उपस्थित होते. त्यांनी महिला दिनाच्या शुभेछा दिल्या. रत्नागिरी ग्राहक पेठ च्या संचालिका प्राची शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत भेट वस्तू देऊन केले व आभार मानले.
www.konkantoday.com