आम. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने उमरे नळपाणी योजनेसाठी १२कोटीचा निधी मंजूर १० गावांचा पाणी प्रश्न मार्गी


देवरूख (सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे उमरे आधी १० गावांसाठीच्या नळपाणी योजनेला मंजूरी मिळावी म्हणून आम. शेखर निकम यांच्या अथक प्रयत्नाला यश येवून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विषेशबाब म्हणून ११.९१.५९.२३१ रू. चा निधी पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंजुर करत त्या नि़धी मंजुरीचे पत्र आ. निकम यांचेकडे सुर्पद केले..
संगमेश्वर तालुक्यातील कसबा उमरे. नावडी फसवणे. उमरे आदी गावांसाठी ३०वर्षापुर्वी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नळ पाणी योजना सुरू झाली होती.. त्यानंतर हि योजना विस्तारीत करून नजीकच्या काही गावांना पाणी पुरवठा करणे आठी नविन योजना करावी अशी मागणी त्याभागातील जनतेकडून सुरू होती. त्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने हे काम अनेक वर्षे रेंगाळले होते. या प्रश्नासाठी आम. शेखर निकम यांनी सर्वांना बरोबर घेत याभागातील माझी जिप अध्यक्ष राजू महाडीक. जिप.सदस्या सौ. रचना महाडीक प.स. सदस्य.बंडा महाडिक. व १०गावातील सरपंच यांचे बरोबर बैठका घेवून हा प्रश्न मार्गी लावणेसाठी निकष बदलेणेसाठी प्रयत्न सुरू केले.. त्या नुसार जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नविन प्रस्ताव जिवन प्राधिकरण रत्नागिरी यांचे मार्फत तयार करून सदरचा प्रस्ताव पाणी व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देवून पाठपुरठा केला. त्यातील काही गावासाठी स्वतंत्र योजना राबविल्या गेल्या आहेत. त्या वगळून संगमेश्वर व १०गावे यात फणसवणे कळबस्ते. भेकरेवाडी. भिम नगर. मलदेवाडी. उमरे.कोंड उमरे. अंत्रवली या गावांसाठी नविन योजना करताना दरडोई उत्पन्न कमी असलेने निकषात बसत नसलेने ती जिल्हा परिषदेला करता येत नसलेने जल जीवन मिशन या कार्यक्रमांतर्गत जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून हि नवी योजना विषेशबाब म्हणून मंजूर केली करणेत आली आहे.
सदरचानिधी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत (राज्य हिस्सा) (२२१५ ए०९७ व ए०६१) या लेखाशिर्षका़खालील मंजूर अनुदातून अंतिमत: खर्च करावा असा आदेश राणी देवकाते कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी पारीत केला आहे.
हि योजना मंजुर होणेसाठी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे.उपमुख्यमंत्री. अजित पवार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी खेळल्या सहकार्यामुळेच हि योजना मार्गी लागली असल्याने आम. शेखर निकम यांनी सांगितले व त्याना धन्यवाद दिले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button