रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी सुवर्णा सावंत

रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी सुवर्णा सावंत यांची बढतीने नियुक्ती झाली आहे. विभागीय परीक्षा मंडळ कोल्हापूरच्या त्या सहायक सचिव पदावर कार्यरत होत्या. सौ. सुवर्णा सावंत यांना शिक्षण क्षेत्रातला मोठा अनुभव आहे. सावंत या सन २०००ते २००६ पर्यंत माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. २००६ ते २०१० साखरपा येथे विस्ताराधिकारी तर २०११ ते २०१५ कालावधीत त्यांनी रत्नागिरी तालुक्यात गट शिक्षणाधिकारी म्हणून काम केले. २०१५ पासून मेन राजाराम कॉलेज कोल्हापूरला त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. २०१७ ते २०१९ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले. यावेळी त्यांनी कागल व गगनबावडा येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. २०१९ ते आजपर्यंत त्या विभागीय शिक्षण मंडळ कोल्हापूरच्या साहायक सचिव म्हणून काम पाहिले. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्याने अनुदान घेणाऱ्या शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. शिक्षण क्षेत्रातील अनुभव असलेल्या सुवर्णा सावंत यांची जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी बढती झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button