
चिपळुणातील बंद बांधकाम परवानगीचा प्रश्न मार्गी लावा, मिलिंद कापडी यांची मागणी.
राज्य शासनाने चिपळूण शहरावर लादलेला लाल व निळ्या पूररेषेमुळे नवीन बांधकामे रखडली आहेत. बांधकामांना परवानगी मिळत नसल्याने शहराचा विकास थांबला आहे. तरी यावर ठोस निर्णय घेवून शहरातील बंद बांधकाम परवानगीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ना. अजितदादा पवार हे दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी दौर्यावर होते.
या ठिकाणी शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी ना. पवार, पालकमंत्री ना. उदय सामंत, प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार शेखर निकम उपस्थित होते. लाल व निळ्या पूररेषेमुळे शहरात निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधताना त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन ना. पवार यांना दिले.www.konkantoday.com