
नितेश राणे यांनी ‘गंदा है पर धंदा है’ असं म्हणत ट्वीट केलं
शिवसेनेकडून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात होणाऱ्या टीकेची धार आणखीच वाढली. आता शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जाहिरात झळकली. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी ‘गंदा है पर धंदा है’ असं म्हणत ट्वीट केलं आहे.शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईतील एका कार्यक्रमात याबाबत विचारले असता त्यांनी वृत्तपत्रात जाहिराती कुणाच्याही येवू शकतात, असे म्हणत थेट भाष्य करणे टाळले. पुणे भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जाहिरात प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती.
www.konkantoday.com