देवरूखमध्ये नऊ किलो सुपारीपासून बनवले शिवलिंग

देवरूख येथे महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा देवरूख येथे नऊ किलो सुपारीपासून शिवलिंग साकारण्यात आले. दीपप्रज्ज्वलनानंतर मेडिटेशन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ब्रह्माकुमारी माधवीदीदींनी महाशिवरात्र या विषयावर मार्गदर्शन केले. धोत्र्याची फुले व फळे, रुईची पाने, फुले, बेलपत्र यांचे मानवी जीवनातील औषधी गुणधर्म सांगून या प्रकारच्या वनस्पतींचे आपण जतन केले पाहिजे, असे माधवीदीदींनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, वैदेही सावंत, सुरेंद्र माने यांनी मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाला दर्शना भोजने यांचे सहकार्य लाभले. आभार युयुत्सु आर्ते यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button