दिव्यातील तरुण तेजस हंजनकर याने छोटय़ा वॅगनआर कार चालवून जनशताब्दी एक्सप्रेसला मागे टाकण्याचा विक्रम केला
कल्याण – मुंबई ते गोवा हे बाराशे किलोमीटरचे अंतर छोटय़ा वॅगनआर कार चालवून कोकणच्या अतिजलद जनशताब्दी एक्सप्रेस मेलला दिव्यातील तरुण तेजस हंजनकर याने मागे टाकण्याचा विक्रम केला आहे.त्याच्या या विक्रमाची नोंद घेतली जाणार असून विक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. १ मार्च रोजी तेजसने हा विक्रम केला, तेजस हा कार चालक आहे. तो दिवा शहरात राहतो.
तेजस हा कारचालक असल्याने तो वेळ, अंतर आणि वेगाचे गणित जुळवण्याचे नवे प्रयोग करीत असतो. मुंबई गोवा रिटर्न हे अंतर त्याने जनशताब्दी एक्सप्रेसच्या आधी कापण्याचा विक्रम केला आहे. जनशताब्दी एक्सप्रेस गाडी मुंबईहून पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निघते. ती मडगावला दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पोहचते. त्याठीकाणचा हॉल्ट घेऊन गाडी पुन्हा दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी निघते. ती मुंबईत रात्री ११ वाजून २० मिनिटांनी पोहचते.
जुन्या मुंबई गोवा मार्गाने तेजसने वॅगनआर कारने प्रवास केला. मुंबई ते मडगाव हे अंतर त्याने रस्त्याने आठ तास ५ मिनिटात पार केले. तर पुन्हा मडगाव ते मुंबई हे अंतर ८ तास २७ मिनिटात पार केले. परतीच्या प्रवास २२ मिनीटांचा फरक का पडला याविषयी तेजस यांना विचारणा केली असता रस्ता खराब असल्याने हे अंतर पडले. मात्र, दोन्ही वेळा जाताना आणि येताना त्याने जनशताब्दी एक्सप्रेसच्या आधी पोहचण्याचा विक्रम केला. त्याने १६ तास ३१ मिनिटांच्या प्रवासात केवळ ३४ मिनिटांचा थांबा घेतला होता. तो त्याच्या रेकाडॅ टाईममध्ये समाविष्ट नाही. त्याने एकूण १७ तास ५ मिनिटे प्रवास केला.
तेजसच्या विक्रमाची नोंद एशिया बूक ऑफ रेकाडॅ आणि लिम्का बूक ऑफ इंडिया यात केली जाणार आहे. तेजसला त्याच्या या कामात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह समस्त शिवसेना मित्र परिवाराने मदत केली. तेजसने सांगितले की, त्याने यापूर्वी पुण्यातील फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट स्पर्धेत भाग घेऊन एक किलोमीटर २५ मीटर अंतरात दोन वेळा दुसरा येण्याचा मान मिळविला आहे. त्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याची आई प्रतिभा आणि वडिल चंद्रकांत यांना दिले.
www.konkantoday.com