ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन
क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन मीडियाला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, “शेन त्याच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले.”
www.konkantoday.com