
मतदान जनजागृतीबाबत नागरिकांना संदेश देत ‘मतदान करा’ अशी मानवी साखळी
कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल, येथे विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृतीबाबत नागरिकांना संदेश देत ‘मतदान करा’ अशी मानवी साखळी तयार करण्यात आली.ही मानवी साखळी लक्षवेधी ठरली.रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कणकवली नगरपंचायत व कलाशिक्षक प्रसाद राणे यांच्या नियोजनातून शिक्षक व विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. www.konkantoday.com