
बसनितील स्वयंभू श्री महालक्ष्मी श्री रवळनाथ देवस्थान पालखी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू
बारा वाड्याचा बारा गावाचा हा देव पालखीत विराजमान होऊन प्रत्येक गावकऱ्यांच्या घराला भेट देतो वर्षातून एकदा हा उत्सव मोठ्या उत्साहात ग्रामस्थ आणि चाकरमानी आनंदाने साजरा करतात दिवाळी पेक्षा कोकणातील शिमगा खास करून रत्नागिरीतील बसणी,काळबादेवी,आरे,भोवरी,सडये, कासारवेली गावातील हा सोहळा उत्साहात साजरा करतात बसणी गावातील महालक्ष्मी रवळनाथ वर्षातून एकदा चक्क प्रत्येकाच्या घरात विराजमान होतात रत्नागिरी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील बसणी हे एकमेव ठिकाण आणि देवस्थान आहे येथे देवळातील देवांना सजऊन प्रत्येकाच्या घरा घरात नेले जाते




