
समविचारींच्या ठिय्या आंदोलनाचा धसका घेतलेल्या जिल्हा रुग्णालयात पोलिस तैनात
रत्नागिरीः कोरोना काळात काम करीत असलेल्या परिचारीका,कक्षसेवक,दाई आणि विविध तंत्रज्ञ यांना मागील पाच महिने वेतन मिळालेले नाही सदरील वेतन तत्काळ अदा करावे अन्यथा ठिय्या आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.समविचारीच्या या इशा-यावर जिल्हा रुग्णालयात पोलिसांना आधीच पाचारण करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक जाणूनबुजून याकामी दुर्लक्ष करुन पगार देण्यात कुचराई करीत असल्याचे समविचारींनी सांगितले .कुणी कितीही खबरदारी घेतली तरी समविचारीची ठरलेली आंदोलने त्या वेळेतच होतात.
जिल्हा सर्वसाधारण शासकीय रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून सर्वसामान्य वेठीस धरण्याचे काम जोरात सुरु आहे.याबाबतही आता समविचारीने लक्ष घालावे असे अनेक नागरिकांनी सांगितले.
याबाबतीत समविचारी मंच लक्ष ठेवून असून जिल्हा रुग्णालय अंतर्गत चाललेल्या गैर कारभाराविरोधात दणदणीत आंदोलन पुकारेल असा इशारा सर्वश्री बाबा ढोल्ये,संजय पुनसकर,मनोहर गुरव,निलेश आखाडे,रघुनंदन भडेकर,सौ.गंधाली सुर्वे आदींनी दिला आहे.