
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथे खाद्यपदार्थाच्या दुकानात रात्री उशिरा सिलिंडरचा स्फोट ,कोणीही जखमी नाही ,दुकानाचे नुकसान
रत्नागिरी -(आनंद पेडणेकर )रत्नागिरी शहरातील उद्यमनगर रोडवर हयात नगरजवळ असलेल्या
सम्राट प्लाझा या इमारतीतील खाली असलेल्या तळघरातील गाळ्यात बंद दुकानात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होण्याची घटना रात्री एक वाजता घडली आहे या दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे मात्र हा प्रकार रात्री उशिरा घडल्याने कोणीही जखमी झाले नाही
सम्राट राजा या इमारतीत तळघरात गाळे आहेतया गा ळ्यात अनेकांनी दुकाने थाटली आहेत या भागातील खाऊ गल्ली म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे याठिकाणी अनेक लोक खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी सायंकाळी गर्दी करीत असतात मात्र यातील अनेक दुकाने अनधिकृत असून एका लायसनवर चार चार दुकाने चालवली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे काल असाच फास्टफूड दुकानातील मालकाने दुकान बंद करून गेल्यानंतर रात्री एक वाजून दहा मिनिटांनी या दुकानात ठेवलेल्या गॅसच्या सिलिंडरचा स्फोट झाला त्यामुळे मोठा आवाज आला दुकान बंद असल्याने कोणीही जखमी झाले नाही मात्र दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे याठिकाणी सुरक्षितेबाबत नियम पाळले जात नसून अनेक जण दुकानासाठी घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याचेही कळते आता यापुढे तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने पुढाकार घेणे आवश्यक आहे तसेच अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करणे आवश्यक आहे
www.konkantoday.com




