युक्रेनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी अडकले
रत्नागिरी : रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होऊ लागले आहे. भारतातील अनेकजण युक्रेनमध्ये अडकले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील तीन तर चिपळूण, मंडणगड, रत्नागिरी, लांजा व दापोली तालुक्यातील एक असे एकूण आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या नातेवाईंकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असून, या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे. हे सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचे पालकांनी प्रशासनाला सांगितले आहे.
अद्वैत विनोद कदम, साक्षी प्रकाश नरोटे, जान्हवी उमाकांत शिंदे, वृषभनाथ राजेंद्र मोलाज, आकाश अनंत कोनाक, मुस्कान मन्सुर सोलकर, सलोनी साजीद मणेर, ऐश्वर्या मंगेश सावंत अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येw चिंतेचे वातावरण पसरले आहे.