
महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस भवन येथे केंद्र सरकारचा निषेध
महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना झालेल्या अटकेचा आज येथे महाविकास आघाडीतर्फे निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा आणि शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोदी सरकार हाय हाय,ह्या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, मलिक यांच्या अटकेचा निषेध असो अशा घोषणानी काँग्रेस भवन परिसर दुमदुमून गेला होता. त्यावेळेस महविकास आघाडीचे राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये,बशीर मुर्तुजा, राजन सुर्वे, कपिल नागवेकर,बिपिन बंदरकर,निलेश भोसले, सुस्मिता सुर्वे,सुदेश ओसवाल, बरकत काझी,चेतन नावरांगे, बारक्या हळदणकर, शफाकत काद्री, अनिरुद्ध कांबळे, सुनील विश्वासराव इत्यादी महविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com