साहसी जल सफारीचा आनंद लुटण्यासाठी गणपतीपुळे येथे अतिवेगवान पॅसेंजर जेट बोट सुरु हाेणार
मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १६ कोटी ९२ लाखांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता दिली असून याबाबतचे आदेश वितरीत करण्यात आले आहेत. या अंतर्गत गणपतीपुळे येथे भारतातील अतिवेगवान पॅसेंजर जेट बोट सुरु करण्यात येणार आहे. सुमारे २ कोटी ५० लाख किमतीची हि बोट ऑक्टोबर पर्यंत येणार असून यामुळे कोकणातील जल पर्यटन जागतिक नकाशावर येणार आहे.गणपतीपुळे जल पर्यटनाच्या माध्यमातून जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सुमारे १५ ते २० पॅसेंजर बसण्याची या बोटीची क्षमता असून अवघ्या अर्ध्या तासात हि बोट गणपतीपुळे ते आरे वारे हे अंतर प्रचंड वेगात कापणार आहेया जेट बोटीची १ तासाची व १५ मिनिटांची अशा दोन सफारी असणार असून १५ मिनिटांची सफर हि गणपतीपुळे आसपासच असणार आहे. अत्यंत वेगवान व साहसी जल सफारीचा आनंद यामुळे पर्यटकांना मिळणार आहे.त्यामुळे गणपतीपुळे येथील पर्यटनात वाढ होईल असा अंदाज आहे
www.konkantoday.com