एनसीसी कातळी संघ ठरला ओमसाई स्पोर्टसच्या चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी

रत्नागिरी : ओमसाई स्पोर्टस आयोजित रत्नागिरी जिल्हा टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन ट्रॉफी 2022 अंतिम सामना नुकताच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी येथे झाला. यात एनसीसी कातळी संघाने रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्याततील दोन्ही संघांची 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या खुल्या गटातील डे-नाईट रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. तसेच पराभूत झालेल्या संघातून ज्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा बारा खेळाडूंची निवड ओम साई स्पोर्ट्स यांनी केली आहे. दोन्ही संघांना या बारा खेळाडूंपैकी कोणताही खेळाडू आपल्या संघातून खेळवता येणार आहे.
विजेता एनसीसी कातळी संघाला रोख 50 हजार रुपये व प्रवीण भाटकर यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक, उपविजेत्या रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाला रोख 25 हजार रुपये व प्रवीण भाटकर यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. अंतिम सामन्यात एनसीसी कातळी संघाचा सचिन शिवणेकरने 14 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकारासह 45 धावा करून सामनावीर पुरस्कार मिळवला. रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाच्या मोहसीन बुरानकरने संपूर्ण स्पर्धेत 96 धावा करून सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार पटकावला.
रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाच्या रिझवान सुर्वेने 7 फलंदाज बाद करत सर्वोत्तम गोलंदाजाचा बहुमान मिळवला. एनसीसी कातळी संघातील सचिन शिवणेकरने स्पर्धेत 128 धावा काढून ‘मालिकावीर’ किताब पटकावला. ही संपूर्ण स्पर्धा टेनिस क्रिकेट इन या युट्यूूब चॅनलवर लाईव्ह दाखवण्यात आली. बक्षीस वितरण वेळी दीपक पवार, पराग सावंत, रजनीश परब, चंदन खानविलकर, बाळू साळवी, दीपक मोरे, सईद मुकादम, अमित लांजेकर, निलेश नायर व अजीम चिकटे उपस्थित होते. पंच म्हणून अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत, सुयोग देवस्थळी, गौरव भागवत, मेघेश मोंडकर, रमीझ सोलकर, वैभव सावंत, निनाद सहस्रभुते, दर्शना पवार, सोनम चव्हाण यांनी काम पाहिले. सामन्यांचे समालोचन गोपीचंद व दीपक कांबळे यांनी
केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button