आंगणेवाडीच्या जत्रेला विमानाने येत असाल तर खिशाला बसणार चाट

दोन वर्षांनंतर मालवणच्या आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. एकीकडे स्थानिक प्रशासन, ग्रामस्थांनी जत्रेची चोख तयारी केली आहे, तर दुसरीकडे मुंबईतूनही हजारो गाड्या यात्रेसाठी रवाना होत आहेत
.मात्र खास यात्रेसाठी विमानाने सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणारे चाकरमान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे कारण तिकीट झाले आहे तब्बल 15 हजार रुपये!
वेबसाइटवर भाडेपत्रक झळकले आहे ते खिशाला चाट लावणारेच आहे. मुंबईहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी एकमेव विमान दररोज सकाळी 11 वा. 40 मिनिटांनी पोहचते. या विमानाचे 23 तारखेचे भाडे 12,390 रुपये, तर 24 तारखेचे (जत्रेच्या दिवशी) प्रवासभाडे आहे 15330 रुपये. इकॉनॉमी फ्लेक्सी या गटातील भाडे तर तब्बल 18900 रुपये एवढे दाखवण्यात येत आहे.त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने विमान कंपनीचे दिवस चांगले आले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button