साध्या वेशात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि जुगार खेळणारे 6 जण रंगेहाथ सापडले

चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी शनिवारी रात्री गोवळकोट रोड परिसरात क्लबवर छापा टाकून बेकायदेशीर जुगार खेळणार्‍या सहाजणांना ताब्यात घेतले. बारी यांना खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत साध्या वेशात दुचाकीवरून जाऊन ही कारवाई शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास केली.
यामध्ये सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. अड्ड्यावर सुमारे आठजण पत्त्यांच्या माध्यमातून जुगार खेळताना आढळून आले. छापा पडताच त्यातील दोघे पळून गेले. छाप्यामध्ये सलीम रज्जाक अकबानी (वय 34), संतोष विजय तांबे (वय 34, दोघेही रा. गोवळकोट रोड), मुदस्सर इफ्तिकार साबळे (वय 37, रा. मिरजोळी), आशुतोष विनोद खेराडे (वय 24), नीलेश गंगाराम जाडे (41, दोघेही रा. शंकरवाडी), मैनुद्दीन अकबर अली दखनी (33, पिंपळी) या संशयितांना ताब्यात घेतले तर रोहित माटे (खाटीक आळी) व दिनेश खेडेकर (राहूल गार्डन) या दोन संशयितांनी पलायन केले. गोवळकोट रोड झाडकुंडी येथे हा जुगार अड्डा अनेक दिवस सुरू होता. या छाप्यात पोलिसांनी संशयितांकडून 8 हजार 260 रूपयांची रक्‍कम, पत्ते, टेबल, खुर्च्या, मोबाईल, दुचाकी असा सुमारे 1 लाख 35 हजार 522 चा मुद्देमाल जप्‍त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button