लोटे औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत बांधकाम पाडले

खेड : औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात
लोटे औद्योगिक वसाहतीमधील अनधिकृत बांधकाम मंगळवारी पाडले. काही बांधकामे पाडण्यात न आल्याने त्यांना अभय का? असा सवाल करण्यात येत आहे. कारवाईवेळी औद्योगिक विकास महामंडळाचे रत्नागिरी प्रादेशिक अधिकारी श्री. पाडाळकर व खेर्डी येथील उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत भगत उपस्थित होते. लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील एक्सल फाट्यानजीक व लोटे गावाच्या व परिसरात औद्योगिक वसाहतीच्या जागेवर झालेले अतिक्रमण यावेळी तोडण्यात आले. यावेळी सहा ठिकाणी अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button