नगर परिषदेने स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे न मारल्यामुळे हाेत आहेत अपघात
रत्नागिरी शहरात पूर्वी खड्डयांमुळे अपघात होते मात्र आता रस्ते गुळगुळीत झालेत तरीसुध्दा अपघात होत आहेत. याच कारण आहे नगर परिषदेने स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे न मारल्यामुळेच. रात्री काळोखात स्पीड ब्रेक न दिसल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली.
काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एस.टी.स्टॅण्डकडून मारुतीमंदिरच्या दिशेने येणार्या दुचाकीस्वाराचा मारुती मंदिर येथील श्रध्दा भेळच्या समोर असलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की, स्पीड ब्रेकरवरुन उडालेला दुचाकीस्वार 15-20 फुटापर्यंत गाडीसह फरफटत गेला. तो पुढे जावून गजानन स्वीट मार्टच्या समोर धडकला. अंदाजे 45 वयाच्या असलेल्या या स्वाराच्या डोळा वाचला. मात्र पाया उजव्या पायाला आणि नाकाला जोरदार मार लागल्याने भळाभळा रक्त पडत होते. येथे जमलेल्या नागरिकांनी त्यांना गाडीत बसवून रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल केले. सुदैवाने तेथे उभ्या असलेल्या दुचाकींना धडक बसली नाही. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. स्पीड ब्रेकर न दिसल्याने अपघात झाल्याचे दुचाकीस्वाराचे म्हणणे आहे.
नगर परिषदेने वेळीच याकडे लक्ष देवून शहरातील स्पीडबे्रकरवर पांढरे पट्टे मारुन र होणारे अपघात थांबवावेत अशी मागणी होत आहे.