जिल्ह्यातील ८ कातळशिल्प होणार राज्य संरक्षित

रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव रत्नागिरी पुरातत्व विभाने शासनानाला सादर केला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. राज्य संरक्षित करण्यात येणाऱ्या बारसू, भगवतीनगर, चवेल, देवीहसोळ, कशेडी, कातळगाव, उक्षी, वाडारुट या रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.

कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्टभागावर कोरलेली आहेत. ही शिल्प एका विशिष्ट जागेत न आढळता समुद्र किनार्‍या लगत सुमारे 300 कि. मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळुन येतात. कोकणातील या कातळावर अश्ययुगी संस्कृती रुजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणाऱ्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे त्यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पाच्या भोवती गूढकथा पण परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास त्यांचे संरक्षण आणि जतन होऊ शकते. म्हणून सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले आणि अजूनही सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button