अबब! आबलोलीत पिकवला साडेतीन किलो हळदीचा गड्डा
गुहागर : गेली 18 ते 20 वर्षे हळद लागवड या विषयात काम करून ‘हळद लागवड तंत्रज्ञान’ विकसित करणारे; एसके 4 (स्पेशल कोकण-4) ही निवड पद्धतीने विकसित केलेली हळदीची जात आपल्या शेतकर्यांना देणारे तरूण संशोधक शेतकरी सचिन कारेकर यांनी यावर्षीही हळद लागवडीत 3.600 किलो वजनाचा गड्डा पिकवला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः कोकणातील हवामानात अधिक उत्पादन देणारी व कीड-रोगास सहसा बळी न पडणारी हळदीची एसके 4 (स्पेशल कोकण-4) ही जात विकसित केली आहे. नुकताच नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, इंडिया (गुजरात)च्या वरिष्ठ प्रकल्प सहकारी विपिन रातुरी यांनी कारेकर यांच्या हळद लागवडीच्या प्रक्षेत्राला भेट देऊन कौतुक केले. सचिन कारेकर यांनी आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात 27 फेबु्रवारी रोजी एक दिवसाच्या प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण आयोजित केले आहे.