
मी कोकणी उद्योजक पुरस्कार मुंबईतील शानदार सोहळ्यात संदेश जिमन यांचा सन्मान
शिवभक्त कोकण व निलक्रियेटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यावसायिक सन्मान सोहळा ‘मी कोकणी उद्योजक’ आज मुंबईतील चर्नी रोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाला.या सोहळ्यात रेल्वे मॅन श्री संदेश जिमन यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी त्यानी आजपर्यंत रेल्वेच्या सुविधा संगमेश्वर तालुकावासीयाना मिळण्यासाठी केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला. आणि हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तालुक्यातील प्रत्येकाचा आहे. तालुक्यातुन रेल्वे ने प्रवास करणा-या सर्व प्रवासी वर्गाला मी हा संपर्पित करतो:- असे नम्रपणे नमुद केलेरेल्वेच्या सोयी सुविधांसाठी २४ तास निस्वार्थीपणे संघर्ष करणा-या संदेश जिमन याना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.