भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयास मंत्रिमंडळाकडून पूर्णत: मान्यता -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दोन अतिशय महत्वाचे असे निर्णय हे घेण्यात आले. यात भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयास मंत्रिमंडळाकडून पूर्णत: मान्यता आणि राज्यभरातील विद्यापीठांमधील अध्यासन केंद्रांना ३ कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयांचा समावेश आहे.अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
उदय सामंत यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत त्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दोन अतिशय महत्वाचे ऐतिहासिक असे निर्णय हे घेण्यात आले. यामध्ये पहिला निर्णय होता की भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर हे जे महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय झालेला होता, त्याला आज पूर्णत: मंत्रिमंडळाने मान्यता दिली
www.konkantoday.com