
पाटगाव येथील तरूणाची गळफासाने आत्महत्या
देवरूख : नजीकच्या पाटगाव येथील सचिन वसंत लिंगायत (वय-३९) या तरूणाने बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचा ८ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तेव्हापासून तो सतत तणावाखाली असायचा. भाऊ महेश याच्यासोबत तो राहत होता. बुधवारी दुपारी घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेत सचिनने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. याबाबतची माहिती सचिनचा चुलत भाऊ प्रदीपने देवरूख पोलीस ठाण्यात दिली. यानंतर देवरूख पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. सचिन हा तालुक्यातील नामांकित लोककलावंत होता.